एम. एम. एफ.

संघटनेचा परिचय

महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट सामाजिक संघटनेची स्थापना दि. 26 जानेवारी 2008 रोजी करण्यात आली. अनेक मंडळे संघटना बनवतात. त्याचे बोर्ड आणि फ्लेक्स लागतात पण कार्याच्या अभावामुळे त्या मंडळाचा प्रभाव कमी होत जातो व ती मंडळे एक फलक बनून राहतात अशा मंडळामध्ये व सामाजिक संस्था मध्ये काम करणाÚया तरुणांचा वेळ व पैसा वाया जातो. परिणामी त्यांना बेरोजगारीला सामोरे जावे लागते. अशा संस्था व सामाजिक संघटनामध्ये काम करुन निराश होऊन काही तरुणांनी समाजातील सर्व सामान्य तरुणांसाठी त्यांच्या हितासाठी व त्यांच्या व्यक्तिगत विकासासाठी एक लढा सुरु केला त्याचेच नाव महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट असे ठेवले. अखंड भारताच्या हितासाठी व त्यातील सर्व जाती धर्र्मांच्या लोकांसाठी व त्यांच्या एैक्यासाठी संघटनेने विविध विधायक कार्यक्रम आखले असून त्यानूसार गेल्या पाच वर्षापासून काम चालू आहे. या संघटनेच्या ध्येय व उद्देशांमुळेच संघटनेने आपले ब्रीद वाक्य ‘‘लढा विकासाचा’’ असे ठेवले आहे. संघटना सुरुवातीस युवकांना मोफत पॅनकार्ड बनवून देणे, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करुण देणे गरजू किरकोळ व्यावसायिकांना मोफत शाॅप अॅक्ट लायसन्स बनवून देणे, लग्न, अंत्यविधी व इतर कार्यासाठी अर्थसाहय्य करणे या कामामुळे संघटना समाजात कमी कालावधीत लोकप्रिय झाली. युवकांना व्यसनमुक्त करण्यासाठी व समाजात जातीय सलोखा निर्माण करण्यासाठी संघटनेद्वारे विविध उपक्रम राबवून समाजातिल तेढ दूर करण्याचे वारंवार प्रयत्न केले जातात. संघटना सुरुवातीस रामटेकडी झोपडपट्टीतुन 1 शाखा व 1 आॅफिस येथून सुरु केले व त्याची व्याप्ती वाढत-वाढत संघटनेचे छोटेचे रोपटे आता भल्या मोठया वटवृक्षात रुपांतर झाले. संघटनेत आता 16000 क्रियाशील सभासद असून व परंाडा शहर, मुंबई शहर, सोलापुर, अहमदनगर, मंचर-नारायणगांव , बीड, लातूर शहरा मध्ये शाखा असून 12000 क्रियाशिल सदस्य आहेत. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. नदीम मुजावर व सर्व पदाधिकारी यांनी गोरगरीब तरुणांच्या विकासाचा ध्यास घेऊन त्याचा विकास होण्यासाठीच विविध क्रार्यक्रम राबवित आहेत व अहोरात्र त्यासाठी झटत आहेत. म्हणूनच संघटनेचे थेंबे-थेंबे तळे साचलेले आहे.संघटनेचे विविध कार्य पाहून 1) मा.आरिफ (नसीम) खान (वस्त्रोद्योग अल्पसंख्यांक मंत्री ) 2) एम. एम. शेख (मा. आमदार व महा. प्रदेश अध्यक्ष काँग्रेस (आय) कमिटी) 3) मा. गृहराज्यमंत्री रमेशदादा बागवे , मा. इब्राहिम भाईजान , मा. पी. ए. इनामदार यांनी संघटनेस गौरविले आहे. व कौतुक केले आहे. पुर्ण महाराष्ट्रात संघटनेच्या आता 175 शाखा आहेत.